Kids Health: मुलांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत केळी, कधी आणि कसं खाऊ घालायचं वाचा-kids health bananas are very beneficial for childrens health read when and how to eat them ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kids Health: मुलांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत केळी, कधी आणि कसं खाऊ घालायचं वाचा

Kids Health: मुलांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत केळी, कधी आणि कसं खाऊ घालायचं वाचा

Sep 11, 2024 01:54 PM IST

When and how to eat bananas: सुपरफूडच्या यादीत केळीचा समावेश होतो. पण केळीसंबंधी काही समज-गैरसमज अनेकदा पालकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात.

मुलांच्या आरोग्यासाठी केळी चांगली कि वाईट
मुलांच्या आरोग्यासाठी केळी चांगली कि वाईट

Bananas are beneficial for children's health:  खायला चविष्ट आणि पचायला सोपी अशी केळी लहान असो वा प्रौढ प्रत्येकाच्याच आवडीची आहेत.केळीमध्ये असलेले पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फोलेट, नियासिन, बी6, मँगनीज हे आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. यामुळेच सुपरफूडच्या यादीत केळीचा समावेश होतो. पण केळीसंबंधी काही समज-गैरसमज अनेकदा पालकांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. उदाहरणार्थ, मुलांना केळी कधी आणि कशी द्यायची? प्रत्येक ऋतूत मुलांना केळी देणे सुरक्षित आहे का? पालकांच्या अशाच काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बालरोग तज्ञ डॉ. सुरोजित गुप्ता यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

केळी मुलांसाठी किती फायदेशीर आहेत?

-डॉक्टर सुरोजित गुप्ता यांचे म्हणणे आहे की, केळी मऊ आणि सहज पचण्यासारखी असल्याने, सहा महिने पूर्ण झाल्यावर बाळाच्या आहारात समाविष्ट केले जाणारे ते पहिले पौष्टिक अन्न असू शकते. केळ्यामध्ये असलेले पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.

-केळी तुमच्या मुलासाठी उत्तम प्रवासी अन्न असू शकते. जे तुम्ही मुलाला भूक लागल्यावर कुठेही खायला देऊ शकता. केळी सहज कुठेही नेता येतात.

-बाळाला पहिल्यांदा केळी खायला घालताना केळी पूर्णपणे पिकलेली असावी याची काळजी घ्या. यानंतर, तुम्ही केळी चांगले मॅश करू शकता आणि थोड्या प्रमाणात दूध देऊन ते तुमच्या मुलाला भरवू शकता.

- मुलाला केळी खायला घालताना त्याच्यावर नेहमी लक्ष ठेवा. वयानुसार तुम्ही केळीचे प्रमाण हळूहळू वाढवू शकता.

-केळ्यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करते. केळ्यातील पेक्टिन नावाचे फायबर पाण्यात विरघळणारे असते. हे कर्बोदकांना फ्री फ्लोईग साखरेमध्ये रूपांतरित करते. जे पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्यांमध्येदेखील मुलांना फायदा होतो.

-मुलांच्या हायपर ॲक्टिव्हिटीमुळे त्यांना नेहमी भरपूर ऊर्जा लागते. अशा परिस्थितीत पिकलेली केळी ऊर्जा वाढवणारी असतात. यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स बाळाला त्वरित ऊर्जा देतात.

-केळ्यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या कमी होते.

प्रत्येक ऋतूत मुलांना केळी खायला देता येईल का?

बाल विशेषज्ञ डॉ. सुरोजित गुप्ता सांगतात की, उन्हाळा असो की हिवाळा, केळी हे तुमच्या मुलासाठी उत्तम सुपर फूड आहे. ज्याचा त्यांच्या आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner