Kidney Health: थंडीत तुम्हीही नकळत करताय 'या' ४ चुका, खराब होऊ शकते किडनी, लगेच करा बंद
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kidney Health: थंडीत तुम्हीही नकळत करताय 'या' ४ चुका, खराब होऊ शकते किडनी, लगेच करा बंद

Kidney Health: थंडीत तुम्हीही नकळत करताय 'या' ४ चुका, खराब होऊ शकते किडनी, लगेच करा बंद

Dec 08, 2024 09:32 AM IST

Tips To Keep Kidney Healthy In Marathi: शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीरातील अंतर्गत अवयव निरोगी ठेवावे लागतात. पण हिवाळ्यात आपण अनेकदा अशा अनेक चुका करतो, ज्यामुळे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक असणारी किडनी खराब होऊ लागते.

How To Maintain Kidney Health
How To Maintain Kidney Health (freepik)

What Causes Kidney Damage In Marathi:  ऋतू कोणताही असो, आपले शरीर निरोगी ठेवणे आपल्यावर अवलंबून असते. कारण आपल्याकडून होणाऱ्या आरोग्याशी संबंधित चुका आपल्याला आजारी बनवतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीरातील अंतर्गत अवयव निरोगी ठेवावे लागतात. पण हिवाळ्यात आपण अनेकदा अशा अनेक चुका करतो, ज्यामुळे आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक असणारी किडनी खराब होऊ लागते. जर आपण या चुका ओळखू शकलो नाही आणि सतत करत राहिलो तर काही काळानंतर किडनी देखील खराब होऊ लागते आणि अनेक वेळा आपल्याला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा चुका ओळखून त्या त्वरित थांबवणे गरजेचे आहे. या लेखात आम्ही तुम्हाला हिवाळ्यात केल्या जाणाऱ्या अशा काही चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या किडनीला काही वेळा हानी पोहोचू शकते. चला तर मग जाणून घेऊया...

कमी पाणी पिण्याची सवय-

हिवाळ्यात असे दिसून येते की लोक कमी पाणी पितात आणि त्यामुळे किडनी खराब होतात. कारण शरीराला पुरेसे पाणी मिळत नसल्याने रक्त शुद्ध होत नाही आणि किडनीसह इतर अवयवांना आवश्यक गोष्टी मिळू शकत नाहीत. याशिवाय पाणी कमी प्यायल्यास किडनी इन्फेक्शनचा धोकाही वाढतो.

आहारावर नियंत्रण न ठेवणे-

आपल्या आहारावर नियंत्रण ठेवता न आल्याने किडनीलाही हानी पोहोचते. हिवाळ्यात, आपण बऱ्याचदा जास्त फॅट्सयुक्त पदार्थ खाण्यास सुरवात करतो, जे आपल्या किडनीसाठी देखील हानिकारक असतात. केळी आणि अवाकाडो इत्यादी काही निरोगी फॅट्सयुक्त पदार्थांमध्येही पोटॅशियम जास्त असते. पोटॅशियम किडनीसाठी चांगले असते पण जर ते मर्यादेपेक्षा जास्त खाल्ले तर ते हानी पोहोचवू शकते. विशेषतः किडनीच्या रुग्णांनी याची विशेष काळजी घ्यावी.

थंड हवामानात दीर्घकाळापर्यंत राहणे-

फार कमी लोकांना याची जाणीव आहे की, जर तुम्ही जास्त काळ थंड हवामानाच्या संपर्कात राहिलात, म्हणजे पुरेसे उबदार कपडे घातले नाहीत, तर त्यामुळे तुमच्या किडनीचेही नुकसान होऊ शकते. कारण थंडीमुळे रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयाबरोबरच किडनीलाही नुकसान होते. विशेषत: ज्या लोकांची किडनी आधीच कमकुवत आहे त्यांच्यासाठी यामुळे मोठी समस्या उद्भवू शकते.

प्रदूषणाचा संपर्क-

हिवाळ्याच्या मोसमात प्रदूषण वाढते, यामागे अनेक कारणे असतात. पण हे प्रदूषण तुमच्या फुफ्फुसांना आणि श्वसनसंस्थेलाच हानी पोहोचवत नाही. किंबहुना त्यामुळे किडनीचेही नुकसान होते. प्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढतो, ज्यामुळे किडनीच्या समस्यांचा धोका वाढतो.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

 

Whats_app_banner