Kidney Health: रात्री शरीरात दिसतात 'ही' लक्षणे? करू नका दुर्लक्ष, असू शकतात किडनी खराब होण्याचे संकेत
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kidney Health: रात्री शरीरात दिसतात 'ही' लक्षणे? करू नका दुर्लक्ष, असू शकतात किडनी खराब होण्याचे संकेत

Kidney Health: रात्री शरीरात दिसतात 'ही' लक्षणे? करू नका दुर्लक्ष, असू शकतात किडनी खराब होण्याचे संकेत

Nov 08, 2024 10:49 AM IST

symptoms of kidney failure: किडनीचे मुख्य कार्य म्हणजे आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकणे. अशा स्थितीत किडनी व्यवस्थित काम करत नसेल तर त्यामुळे शरीरात खूप घाण जमा होऊ लागते.

Night symptoms of kidney failure
Night symptoms of kidney failure (freepik)

Night symptoms of kidney failure:  किडनी हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील घाण काढून टाकणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. किडनीत कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आपल्या कार्यप्रणालीवर मोठा परिणाम होतो. किडनीचे मुख्य कार्य म्हणजे आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकणे. अशा स्थितीत किडनी व्यवस्थित काम करत नसेल तर त्यामुळे शरीरात खूप घाण जमा होऊ लागते. यामुळे किडनीवर जास्त दबाव पडतो, ज्यामुळे किडनी खराब होऊ शकते. त्यामुळे, तुम्हाला तुमच्या किडनीच्या आरोग्याबाबत अधिक सावध राहण्याची गरज आहे. किडनीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आपले शरीर काही दिवस अगोदरच त्याचे संकेत देऊ लागते. रात्रीच्या वेळीही किडनी खराब होण्याची चिन्हे दिसतात, ज्याकडे लक्ष दिल्यास तुम्ही किडनीच्या नुकसानाचे गांभीर्य टाळू शकता. चला जाणून घेऊया किडनी खराब होण्यापूर्वी रात्री कोणती लक्षणे दिसतात?

रात्री जास्त लघवी होणे-

किडनीत कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास रुग्णांना खूप लघवी होऊ लागते. हा त्रास रात्रीच्या वेळी अधिक जाणवतो. खरं तर, जेव्हा आपली किडनी व्यवस्थित काम करत नाही तेव्हा शरीरात मोठ्या प्रमाणात घाण जमा होऊ लागते. त्यामुळे रुग्णांना खूप लघवी होऊ लागते.

रक्तदाबात अचानक वाढ-

किडनी निकामी होण्याआधी किंवा किडनी खराब होण्यापूर्वी तुमचा रक्तदाब लक्षणीयरीत्या वाढू शकतो. तुम्हाला ही समस्या रात्री खूप जाणवू शकते. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी अशी लक्षणे वारंवार जाणवत असतील तर एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

झोपायला त्रास होतो-

रात्री झोपताना वारंवार लघवी होत असल्याने तुम्हाला झोपेचा त्रास होऊ शकतो. अशी चिन्हे किडनीच्या नुकसानाकडे निर्देश करतात. त्याकडे दुर्लक्ष करणे टाळा. हे खूप गंभीर असू शकते.

लघवीतून फेस येणे-

किडनी निकामी होण्याआधी किंवा किडनी खराब होण्याआधी, रुग्णांना रात्री लघवीमध्ये जास्त फेस दिसू शकतो. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांची मदत घ्या.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner