किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव आहे. किडनीमध्ये थोडासा अडथळा देखील संपूर्ण शरीरावर परिणाम करतो. जर किडनी योग्यरित्या कार्य करत नसेल, तर शरीरात विषारी पदार्थ जमा होतात आणि आपल्याला अनेक रोगांचा त्रास होऊ शकतो. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, किडनी शरीरातील घाण फिल्टर करते आणि लघवीद्वारे बाहेर टाकते.
ही घाण बाहेर पडली नाही तर कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर, किडनी स्टोन अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे किडनीचे आरोग्य जपणे प्रचंड महत्वाचे आहे. किडनीचे आरोग्य राखण्यासाठी काही खास फळे खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
सफरचंद- सफरचंदामध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी असते. त्यामुळे तुम्ही तुमची किडनी निरोगी ठेवण्यासाठी सफरचंद खाऊ शकता. त्यात व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. शिवाय त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते.
व्हिटॅमिन सीयुक्त फळे- लिंबू, संत्री, द्राक्षे, यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारते. तसेच मुतखड्याची समस्या उद्भवत नाही. यासाठी तुम्ही कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळून रिकाम्या पोटी प्या. हे मूत्रमार्गातून विषारी पदार्थ शरीराबाहेर बाहेर टाकते.
अव्हाकाडो- अव्हाकाडोमध्ये भरपूर पोटॅशियम असते. जर तुम्हाला किडनीचा आजार असेल, तर ते घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोला. जर किडनी पूर्णपणे निरोगी असेल तर तुम्ही अव्हाकाडो मर्यादित प्रमाणात खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला तुम्हाला हेल्दी फॅट, फायबर आणि अँटिऑक्सिडंट घटक मिळतील.
स्ट्रॉबेरी- स्ट्रॉबेरीमध्ये सोडियम आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी असते. ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरीसारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी, मँगनीज, फोलेट, अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये कमी कॅलरीज असतात. यामध्ये तुरट गुणधर्म आहेत. ज्याचा किडनीला फायदा होतो.
अननस- किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नियमित अननस, टरबूज, चेरी, पिअर इत्यादी फळांचे सेवन करू शकता. अननसात 'ब्रोमेलेन' नावाचे पाचक एंझाइम असते. जे मुतखड्याला विरघळण्यास मदत करते. हे फळ व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. जो किडनीशी संबंधित आजारांपासून संरक्षण करते.