Beauty Routine of Kiara Advani: कियारा अडवाणी आज म्हणजे ३१ जुलैला तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ३३ वर्षांची कियारा अडवाणी अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांचा चेहराच्या ग्लो कधीच कमी दिसत नाही किंवा तिच्या फिटनेसमध्येही फरक पडत नाही. या फ्लॉलेस ब्युटी आणि फिटनेसचे रहस्य म्हणजे वर्कआउट. ज्यामुळे कियाराचे शरीर फिट तर राहतेच पण त्वचाही चमकते. तर जाणून घ्या काय आहे कियारा अडवाणीच्या ब्युटी आणि परफेक्ट फिट बॉडीचं रहस्य.
कियारा अडवाणीने व्होगला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्वचा सुंदर बनवण्यासाठी आतून तसेच बाहेरून लावलेल्या प्रोडक्टचा चांगला परिणाम होतो. म्हणूनच ते योग्य पोषक आणि विज्ञानाने समृद्ध असतात.
कियारा अडवाणीच्या सुरुवातीपासूनच फ्लॉलेस स्किनचे रहस्य म्हणजे होममेड फेस पॅक, जे तिची आई बनवायची. हा फेस पॅक बनवण्यासाठी फ्रेश क्रीम किंवा दुधाची साय आणि बेसन मिक्स करून पेस्ट तयार करा. हे स्क्रबप्रमाणे त्वचेवर लावल्याने सर्व मृत त्वचा नष्ट होते आणि फ्लॉलेस स्किनही मिळते.
कियारा अडवाणी त्वचा ग्लोइंग बनवण्यासाठी टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावर लावते. ज्यामुळे झटपट चमक मिळते.
कियारा अडवाणी केसांची देखील विशेष काळजी घेते. निरोगी केसांसाठी ती केसांच्या मध्यभागी आणि एंडला जास्त हेवी तेल वापरत नाही. जास्त तेलामुळे जास्त शॅम्पू वापरावा लागतो आणि केस पुन्हा कोरडे होतात. मात्र, कियारा म्हणते की, ती केसांमध्ये कोणत्याही प्रकारची स्टायलिंग करत नाही तर स्टाइलसह हेअर एक्सटेन्शनचा वापर करते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या