How to make chapati soft and tasty: प्रत्येक भारतीय घरात दिवसातून एकदा तरी चपाती बनवली जाते. कुठे जाड चपाती खाण्यास प्राधान्य दिले जाते, तर कुठे पातळ आणि लहान. अनेकांना मोठी चपाती खायला आवडते तर काहींना कुरकुरीत चपाती आवडते. पण जेव्हा मऊ चपातीबद्दल बोललं जाते तेव्हा बहुतेक लोक तक्रार करतात की त्यांच्या चपाती काही वेळाने कोरड्या होतात. अनेकदा चपाती पापडासारख्या होतात. अशा काय करावं समजत नाही. जर तुम्हाला चपाती मऊ बनवण्याचे टिप्स जाणून घ्यायचे असेल तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो.
> जेव्हा जेव्हा तुम्ही चपातीसाठी पीठ मळून घ्याल तेव्हा चाळणीतून पीठ चाळून घ्या. जर चपातीमध्ये कोंडा किंवा भुसा जास्त असेल तर चपाती देखील कोरडी होऊ शकते.
> पीठ मळून घेताना नेहमी कोमट पाणी वापरा. जर तुम्ही खोलीच्या तापमानाचे पाणी वापरत असाल तर पीठ जास्त वेळ मळून घ्या, अशा प्रकारे चपाती मऊ राहील.
> पीठ मळून घेण्यापूर्वी त्यात चिमूटभर मीठ घालावे. त्यामुळे चपातीची चवही चांगली येईल आणि चपाती मऊ होतील.
> पीठ मळून घेतल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवा. ५ मिनिटांनंतर पुन्हा एकदा ओल्या हाताने पीठ मळून घ्या आणि नंतर चपाती लाटून घ्या.
> जर तुम्हाला तुमच्या चपाती जास्त काळ चविष्ट आणि मऊ ठेवायच्या असतील तर पीठ ताक, दही किंवा दूध घालून मळून घ्या. यामुळे चपाती खूप मऊ होतील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)