Monsoon Care: पावसाळी आजारांपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Monsoon Care: पावसाळी आजारांपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा!

Monsoon Care: पावसाळी आजारांपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा!

Aarti Vilas Borade HT Marathi
Updated Jul 11, 2024 03:54 PM IST

Monsoon Care: पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनचा धोका असतो. अशावेळी स्वत:चा बचाव करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

Monsoon Care
Monsoon Care (Shutterstock )

पावसाळा लोकांना उष्णतेपासून दिलासा देतोच, पण अनेक आजारांचा धोकाही वाढतो. या ऋतूत त्वचेच्या संसर्गासह डेंग्यू, मलेरिया सारखे अनेक आजार होण्याचा धोका असतो. या ऋतूत डासांच्या अळ्यांबरोबरच अनेक प्रकारचे जिवाणू जन्माला येतात. बदलत्या हवामानामुळे अनेकदा लोकांना खोकला आणि सर्दीची ही तक्रार होते. अशावेळी व्हायरल इन्फेक्शनही झपाट्याने वाढते. या काळात स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. चला पाहूया कोणत्या...

खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात ठेवा

शिंकताना किंवा खोकताना अनेकदा लोकांना तोंडावर हात ठेवावा हे लक्षात येत नाही. अशा परिस्थितीत आजूबाजूच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही घरी असाल किंवा बाहेर, खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाकवर हात ठेवा. जेणे करुन आपला संसर्ग कोणाला होणार नाही.
वाचा: अनंत आणि राधिकाच्या हळदी समारंभाला सलमान खानने घातलेल्या घड्याळाची किंमत माहिती आहे का?

हात मिळवणे टाळा

अनेकदा जेव्हा आपण लोकांना भेटतो तेव्हा आपण एकमेकांशी नक्कीच हात मिळवतो. तुम्हालाही ही सवय असेल तर तुम्ही ती टाळावी. असे केल्याने हा संसर्ग इतरांमध्येही पसरू शकतो. त्यामुळे लोकांना हात मिळवणे टाळा. हात मिळवण्यापेक्षा एकमेकांना हात जोडून अभिवादन करू शकता.
वाचा: कार्टून नेटवर्क बंद होणार? सोशल मीडियावरील या ट्रेंडमागचे सत्य काय?

संसर्ग झालेल्या ठिकाणाला स्पर्श करून त्याच हातांनी अन्न खाल्ल्यास संसर्गाचा धोका संभवतो. अशावेळी वारंवार साबणाने हात धुवा. मुलांना वेळोवेळी हात धुण्यास सांगा. शाळेत जाताना त्यांना सॅनिटायझर किंवा हँड रब द्या.
वाचा: सत्यात न्याय मिळवून देणारे नाहीत; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणावर उत्कर्ष शिंदेची संतप्त पोस्ट

बाहेरुन आल्यावर पाय स्वच्छ धुवा

रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अनेक विषाणू असतात. जेव्हा आपण या पाण्यातून चालतो तेव्हा हे विषाणू आपल्या पायाला चिकटतात. बाहेरुन आल्यावर पाय न धुतल्याने ते आपल्या घरात पसरतात. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते.

Whats_app_banner