Karwa Chauth 2024: करवा चौथचा उपवास सोडायला बनवा जाफरानी खीर, झटपट होणारी रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Karwa Chauth 2024: करवा चौथचा उपवास सोडायला बनवा जाफरानी खीर, झटपट होणारी रेसिपी

Karwa Chauth 2024: करवा चौथचा उपवास सोडायला बनवा जाफरानी खीर, झटपट होणारी रेसिपी

Oct 20, 2024 10:23 AM IST

jafarani kheri recipe: विविध प्रकारच्या पदार्थांशिवाय भारतीय सण अपूर्ण वाटतात. कोणताही सण असला की विविध प्रकारचे गोड पदार्थ घरीच तयार होतात. करवा चौथवर महिलाही विविध प्रकारचे पदार्थ बनवतात.

Karwa Chauth Recipe
Karwa Chauth Recipe (freepik)

Karwa Chauth Recipe:  करवा चौथ हा सण विवाहित महिलांसाठी खूप खास असतो. प्रेम आणि पवित्र बंधनाचे प्रतीक म्हणून स्त्रिया करवा चौथला दिवसभर आपल्या पतीसाठी निर्जला उपवास करतात आणि रात्री त्याच्या हातचे पाणी पिऊन उपवास सोडतात. विविध प्रकारच्या पदार्थांशिवाय भारतीय सण अपूर्ण वाटतात. कोणताही सण असला की विविध प्रकारचे गोड पदार्थ घरीच तयार होतात. करवा चौथवर महिलाही विविध प्रकारचे पदार्थ बनवतात. गोडापासून मसालेदारापर्यंत सर्व काही ताटात असते.

खीर हा प्रकार भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. करवा चौथला स्त्रिया खीरही बनवतात. पण तरीही तुम्ही तुमच्या खीरच्या रेसिपीने कंटाळला असाल, तर आम्ही तुम्हाला केसर जाफरानी खीरची एक सोपी रेसिपी सांगतो, जी तुम्ही उपवासाच्या थकव्यातही सहज तयार करू शकता आणि ती खाल्ल्याने तुमचा दिवसभराचा थकवा दूर होईल. शिवाय तुमचे कुटुंबीयसुद्धा तुमची वाहवाह करतील.

*जाफरानी खीर बनवण्याचे साहित्य

१ लिटर दूध

१ कप तांदूळ

१०- १५ केसर

१५० ग्रॅम साखर

२ चमचे बदाम, काजू, पिस्ता, मनुका (बारीक चिरून)

१ टीस्पून वेलची पावडर

१ चमचा तूप

* खीर बनवण्याची सोपी रेसिपी-

- सर्वप्रथम, तांदूळ चांगले धुवून घ्या आणि काही तास पाण्यात भिजत ठेवा.

- आता एका भांड्यात चार चमचे दुधात केशरचे तुकडे टाका आणि बाजूला ठेवा.

-एका जाड तळाच्या भांड्यात दूध मंद आचेवर गरम करा.

- आता भिजवलेले तांदूळ थोडे तुपात तळा आणि उकळत्या दुधात घालून एकसारखे ढवळत राहा.

- तांदूळ शिजल्यावर त्यात साखर घालून मिक्स करा.

- तयार खीरमध्ये वेलची आणि केशर दूध घालून चांगले मिसळा.

-५ ते ७ मिनिटे खीर शिजवून घ्या.

-आता एका कढईत तूप गरम करा, त्यात काजू, बदाम, मनुके, पिस्ते यांसह सर्व बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स घालून हलके तळून घ्या.

-आता तयार खीरला भाजलेल्या ड्रायफ्रुट्सने सजवा. अशाप्रकारे तुमची चविष्ट खीर तयार आहे.

Whats_app_banner