Kargil Vijay Diwas Message and Quotes in Marathi: २६ जुलै रोजी देश २५ वा कारगिल विजय दिवस साजरा करणार आहे. हा दिवस भारतीय लष्करातील शूर जवानांच्या शौर्याला, पराक्रमाला आणि बलिदानाला सलाम करण्याचा दिवस आहे. कारगिल विजय दिवसानिमित्त संपूर्ण भारत कारगिल युद्धातील वीरांच्या शौर्याला आणि पराक्रमाला आदरांजली वाहतो. १९९९ मध्ये कारगिल युद्धात देशाच्या शूर जवानांनी पाकिस्तानचा पराभव केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कारगिल युद्धाचे सांकेतिक नाव ऑपरेशन विजय होते. हे युद्ध ६० दिवसांपेक्षा जास्त काळ चालले आणि २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानी सैन्याचा पराभव करून कारगिल युद्ध जिंकले. २६ जुलै रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या चौक्यांवर तिरंगा फडकवला. त्यांच्या या पराक्रमाच्या, बलिदानाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तुम्ही हे संदेश, कोट्स शेअर करू शकता.
सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला
ती आई आहे भाग्यशाली
जिच्यापोटी जन्मलेल्या वीरामुळे
हा देश अखंड राहिला...
कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा!
कारगिल स्वातंत्र्यासाठी
अनेकांनी केला होता त्याग
वंदन करुनिया तयांसी
आज ठेवूनी त्यांच्या बलिदानाची जान
करुया भारत देशा असंख्य प्रणाम
कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा!
उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी माझा भारत देश घडविला...
कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा!
प्राणांची बाजी लावून,
पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित करून
विजय मिळवणाऱ्या वीर जवानांना
शत शत प्रणाम!
जय हिंद!
भारतीय सैन्याच्या असीम शौर्याची
आठवण जागृत ठेवणाऱ्या
कारगिल विजय दिनाच्या
प्रत्येक भारतीयाला शुभेच्छा!
हिमालयापेक्षा उंच साहस ज्यांचे
देशासाठी सर्वोच्च बलिदान ज्यांचे
अशा भारताच्या वीर जवानांना
शत शत प्रणाम
कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा!
कारगिल युद्धा शहीद वीर जवानांना माझा प्रणाम...
देशासाठी केलेल्या तुमच्या बलिदानाला शत शत सलाम...
कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा!
वाऱ्यामुळे नाही
भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे
फडकतोय आपला तिरंगा!
ही गोष्ट वाहत्या वाऱ्याला सांगा,
प्रकाश असलेले दिवे तेवत ठेवा
जीवाची आहुती देऊन
या तिरंग्याचं रक्षण केलं त्यांनी
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा
कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा!
संबंधित बातम्या