मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  कन्या पूजनाला मुलींना गिफ्ट करा या ५ गोष्टी, माता दुर्गा होतील प्रसन्न

कन्या पूजनाला मुलींना गिफ्ट करा या ५ गोष्टी, माता दुर्गा होतील प्रसन्न

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 29, 2023 11:23 AM IST

Chaitra Navratri 2023: चैत्र नवरात्रीच्या नवमीला घरी लहान मुलींना बोलवून कन्या पूजन केले जाते. यावेळी त्यांना काही गिफ्ट दिले जातात. यंदाच्या कन्या पूजनाला मुलींना देण्यासाठी उपयोगी पडतील या गिफ्ट आयडिया.

कन्या पूजनाला मुलींना देण्यासाठी गिफ्ट आयडिया
कन्या पूजनाला मुलींना देण्यासाठी गिफ्ट आयडिया (HT)

Kanya Pujan Gift Idea: चैत्र नवरात्रीच्या उपवासाचा आठवा दिवस महाअष्टमी आणि नववा दिवस महानवमी म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही दिवशी कन्या पूजनासाठी लहान मुलींना घरी बोलवले जाते. काही लोक कन्या पूजन अष्टमीला तर काही लोक नवमीला करतात. कन्या पूजनाला मुलींना गिफ्ट दिले जातात. जर तुम्ही कन्या पूजनासाठी अद्याप कोणतीही भेटवस्तू खरेदी केली नसेल तर या गिफ्ट आयडिया तुम्हाला मदत करू शकतात.

स्टडी किट

कन्या पूजनाला दिलेली स्टडी किट लहान मुलींना अभ्यासात मदत करू शकते. तुमची ही भेट दीर्घकाळ वापरू शकते. पण जर हे स्टडी किट तुमच्या बजेटच्या बाहेर असेल तर तुम्ही त्याऐवजी पेन्सिल आणि कलर यांसारख्या वस्तूही भेट देऊ शकता.

लंच बॉक्स

रंगीबेरंगी लंच बॉक्स मुलींना शाळेत नेण्यासाठी खूप आवडतात. कन्या पूजन दरम्यान तुम्ही तिला एक छानसे लंच बॉक्स देखील भेट देऊ शकता.

हेअर अॅक्सेसरीज

कन्या पूजनाला बहुतेक लहान मुली घरात येतात. ज्याच्या केसांवर हेअर अॅक्सेसरीज खूप सुंदर दिसतील. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना क्लिप, हेअर बँड भेट देऊ शकता.

पाण्याची बॉटल

लहान मुले शाळेत पाणी पिण्यासाठी पाण्याच्या बॉटल घेऊन जातात. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना बॉटल सुद्धा भेट देऊ शकता.

लाल कापड

हिंदू मान्यतेनुसार नवरात्रात मुलींना जेवण आणि पूजन केल्यानंतर मुलींना लाल कपडा भेट देणे खूप शुभ मानले जाते. पण जर तुमचे बजेट प्रत्येक मुलीला लाल कपडे देण्याचे नसेल तर तुम्ही सर्व मुलींना लाल चुनरी गिफ्ट करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग