मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kala Ghoda Art Festival 2024: कलेची आवड आहे? आवर्जून भेट द्या 'काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल'ला, जाणून घ्या डिटेल्स!

Kala Ghoda Art Festival 2024: कलेची आवड आहे? आवर्जून भेट द्या 'काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल'ला, जाणून घ्या डिटेल्स!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 21, 2024 09:40 AM IST

How to Kala Ghoda Arts Festival: काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल हा फेब्रुवारी महिन्यात होणारा सांस्कृतिक महोत्सव देशातील प्रमुख कला महोत्सवांपैकी एक आहे. इथे जायचं कसं, वेळ, काय करायचं अशा सर्व गोष्टींची माहिती जाणून घ्या.

Information about Kala Ghoda Art Festival 2024
Information about Kala Ghoda Art Festival 2024 (Satish Bate/HT )

Travel Tips: मुंबई, स्वप्नांची नगरी, या नगरात कला असो व राजकारण सगळ्यांनाच वाव मिळतो. मुंबईत अनेक प्रकारचे कार्यक्रम, इव्हेंट, टूर्नामेंट होतात. असाच एक इव्हेंट म्हणजे काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल. सांस्कृतिक, नृत्य, कला आणि संगीताची आवड असलेले लोक काळा घोडा महोत्सवाची आवर्जून हा एक प्रमुख उत्सव आहे. दरवर्षी हा फेस्टिव्हल फेब्रुवारीच्या पहिल्या शनिवारी सुरू होतो आणि दुसऱ्या रविवारी संपतो. यंदा हा काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल २० जानेवारीला सुरु झाला आहे आणि २८ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. आवर्जून इथे येऊन तुम्ही या अनोख्या फेस्टिव्हलचा आस्वाद घ्या. या फेस्टिव्हलला जायचं कसं?, याची वेळ काय आहे?, तिकडे जाऊन नक्की काय बघायचं?, काय मिस करायचं नाही? अशा सर्व गोष्टींची माहिती जाणून घ्या.

कशी झाली फेस्टिव्हलची सुरुवात?

काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल हा मुंबईत आयोजित केला जाणार कला महोत्सव १९९९ मध्ये काळा घोडा संस्थेने सुरू केला होता. काळा घोडा हे नाव फारच इंटरेस्टिंग तेच. पण या नावामागे कोणतीही कथा नाही. खरं तर दक्षिण मुंबई परिसरातील एका ठिकाणी काळ्या घोड्याची मूर्ती आहे. म्हणूनच याला काळा घोडा उत्सव म्हणतात. काळ्या घोड्याचा हा पुतळा ब्रिटिश काळापासून तिथे बसवला गेला आहे.

नक्की कसा असतो फेस्टिव्हल?

या महोत्सवात नृत्य, संगीत, चित्रकला, हस्तकला, ​​ग्राफिक्स आर्ट, सिनेमा आणि साहित्य यासह अनेक प्रकारच्या कलांचे एकत्र प्रदर्शन पाहता येणार आहे. 'काला घोडा फेस्टिव्हल' हा दिल्लीत भरलेल्या 'ट्रेड फेअर फेअर'सारखाच आहे, जिथे भारताव्यतिरिक्त विदेशी कलाकारांच्या सुंदर कलाकृती आणि परफॉर्मन्स पाहण्याची संधी आहे. त्यामुळे तुम्ही कलाप्रेमी असाल तर या महोत्सवाला भेट देण्याची संधी सोडू नका.

या गोष्टी लक्षात घ्या

> फेस्टिव्हलला भेट देण्याची वेळ सकाळी १० ते रात्री १० अशी आहे.

> या फेस्टिव्हलला जाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तिकीट खरेदी करावे लागणार नाही.

> या फेस्टिव्हलमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या कलांची माहिती मिळेल. यामुळे लहान मुलांच्या तसेच प्रौढांच्या मानसिक व शारीरिक विकासासाठी अनेक प्रकारचे उपक्रम येथे उपलब्ध आहेत. त्यामुळे लहान मुलांना आवर्जून घेऊन जा.

> इथे तुम्ही शॉपिंगही करू शकता.

> विविध प्रकारचे पदार्थही इथे चाखता येतात.

फेस्टिव्हलला पोहचायचं कसं?

ट्रेन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) हे सर्वात जवळचे मोठे रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनपासून काळा घोडा फेस्टिव्हल अंदाजे १.५ किमी अंतरावर आहे. तिकडे जाण्यासाठी तुम्ही सीएसएमटीहून टॅक्सी घेऊ शकता.

चर्चगेट हे आणखी एक सोयीस्कर पर्याय म्हणजे चर्चगेट स्टेशन, जे फक्त १.३ किमी अंतरावर आहे. तुम्ही अहिल्याबाई होळकर चौकापासून फेस्टिव्हलला जाण्यासाठी हुतात्मा चौकापर्यंत एकतर चालत किंवा बसने (क्र.१३७) जाऊ शकता.

गाडी

तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येऊ शकता. पण लक्षात घ्या की इथे पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इथे गाडी पार्क करून तुम्ही तिकडून टॅक्सी घेऊन फेस्टिव्हलला जाऊ शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel