मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : दवबिंदू का पडतात असं जेव्हा मास्तर मुलांना विचारतात…

marathi jokes : दवबिंदू का पडतात असं जेव्हा मास्तर मुलांना विचारतात…

HT Marathi Desk HT Marathi
May 31, 2024 10:11 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : दवबिंदू का पडतात असं जेव्हा मास्तर मुलांना विचारतात…
marathi jokes : दवबिंदू का पडतात असं जेव्हा मास्तर मुलांना विचारतात…

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

ट्रेंडिंग न्यूज

नवरा-बायको दोघेही मूडमध्ये असतात. जुन्या आठवणीत रमलेले असतात.

तेवढ्यात बायको बोलते, माझा मोठेपणा बघा,

मी तुम्हाला न बघताच तुमच्याशी लग्न केलं.

नवरा - तुझं सोड गं

माझं मन किती मोठं आहे बघ…

मी तुला बघूनही तुझ्याशीच लग्न केलं!

हेही वाचा: बायकोला फिरायला नेण्यासाठी जेव्हा नवरा त्याच्या बॉसकडं सुट्टी मागतो…

रस्त्यावर कुठंही भांडण चालू असेल तर लोक लगेच उभे राहतात.

हे साफ चुकीचं आहे.

एक नागरिक म्हणून आपलं आद्य कर्तव्य हे आहे की,

आपण खाली बसून भांडण बघावं.

मागच्यांनाही बघण्याची संधी द्यावी!

तिला तिच्या सौंदर्याचा इतका गर्व का आहे तेच कळत नाही.

बहुतेक अजून तिचं आधार कार्ड आलं नसेल.

गुरुजी - दवबिंदू कशामुळं पडतात…

बंड्या - गुरुजी आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते,

फिरून फिरून ती थकते.

तिला घाम येतो. त्यामुळं दवबिंदू पडतात.

(गुरुजींनी राजीनामा दिला)

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel
विभाग