Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
नवरा नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला!
तेवढ्यात बायको म्हणाली…
घरातून बाहेर पडताना देवासमोर हात जोडत जा, सगळी कामं चांगली होतात.
नवरा - यावर माझा विश्वास नाही.
लग्नाच्या दिवशी सुद्धा देवाला हात जोडूनच घराबाहेर पडलो होतो.
…
मुलगा - डार्लिंग, आपल्याला लग्न करायला काहीच हरकत नाही.
आपल्या दोघांच्याही घरचे तयार आहेत, पण…
मुलगी - पण काय?
मुलगा - माझ्या पगारात तुझं सगळं भागेल का?
मुलगी - माझं सगळं भागेल, पण तुझं काय?
…
सून चार दिवस माहेरी राहायला गेली की,
सासू आजारी पडते!
हे कलियुगातील अटळ सत्य आहे!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)