मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : दमून-भागून घरी आलेल्या नवऱ्याशी जेव्हा बायको ताडताड भांडायला लागते…

marathi jokes : दमून-भागून घरी आलेल्या नवऱ्याशी जेव्हा बायको ताडताड भांडायला लागते…

HT Marathi Desk HT Marathi
Jun 14, 2024 03:11 PM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : दमून-भागून घरी आलेल्या नवऱ्याशी जेव्हा बायको भांडायला लागते…
marathi jokes : दमून-भागून घरी आलेल्या नवऱ्याशी जेव्हा बायको भांडायला लागते…

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

मराठी आपली मातृभाषा आहे,

पितृभाषा का नाही?

ट्रेंडिंग न्यूज

कारण…

आईनं बाबांना कधी बोलूच दिलं नाही!

हल्लीचे आई-बाबा मुलांना मारल्यावर गप्प करण्यासाठी

चॉकलेट देतात!

आमचा काळ वेगळा होता…

आमचे आई-बाबा आम्हाला मारल्यावर नंतर गप्प बसवण्यासाठी पुन्हा हाणायचे!

दिवसभर मी दमून-भागून येतो.

थकलेला असतो. जरा फ्रेश होऊ दे.

आल्या-आल्या काय भांडत सुटतेस?

बायको - मी पण दिवसभर एकटी असते. बोअर होते.

मला फ्रेश व्हायला नको का?

आख्खी दुनिया कन्फ्युज होईल की

ह्याला नेमकं आनंद कसला आहे?

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel