Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
माझी एक दुःखद कहाणी,
ज्यांना मी लहानपणी झोपताना
खूपच सुंदर दिसत होतो तेच,
.
.
.
आता मला झोपेत बघितलं की लाथा घालतात.
…
पेशंट - डॉक्टर, मला एक विचित्र आजार झालाय!
डॉक्टर - काय?
पेशंट - जेवणानंतर भूक लागत नाही,
सकाळी उठल्यावर झोप लागत नाही,
काम केल्यावर थकवा येतो!!!
काय करू?
डॉक्टर - रोज रात्री उन्हात बसा…!!!
…
लग्नाची वरात सुरू असते…
डीजेवाला सगळी अरेंजमेंट करून नवरदेवाकडं जातो.
दादा, किती वाजेपर्यंत वाजवायचं आहे?
नवरदेव - ८ ते १० पेग होईपर्यंत वाजवा…
त्याच्यानंतर माझे मित्र नुसत्या जनरेटरच्या आवाजावर पण नाचतील…
…
चिंटू - डॉक्टर, कालपासून पोटात दुखतंय
डॉक्टर - तुम्ही बाहेरचं काही खाता का?
चिंटू - हो…
डॉक्टर - बाहेर काही खात जाऊ नका
चिंटू - ठीक आहे डॉक्टर,
उद्यापासून पार्सल घेऊन येत जाईन…!!!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या