Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
अगं मी बाहेर जातोय,
येताना काही घेऊन येऊ का?
बायको - 'घेऊन' येऊ नका एवढं करा!
…
लग्न झालेला एक इसम देवळात जातो…
देवाला म्हणतो…
देवा, तू बालपण दिलंस, हिरावून घेतलंस…
तारुण्य दिलंस तेही हिरावून घेतलंस…
सुखचैन सगळा हिरावून घेतलास…
आणि एक बायको दिलीस, तिला देऊन विसरून गेलास
…
हे असं पांढऱ्या पँटवर पिवळा शर्ट नका घालत जाऊ
नवरा - का?
बायको - परवा तुम्हाला पाहून माझी मैत्रीण म्हणाली, तुझा वरण-भात आला बघ!
…
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)