Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एक दिवस आर्यभट्ट बसल्या-बसल्या नातेवाईक मोजत होते…
जे वाईट काळात कामी येतील!
बस इथूनच शून्याचा शोध लागला!
…
पूर्वीच्या काळी आपण झोपलो की
आपल्याला आराम मिळायचा!
आता
आपण झोपले की मोबाइलला आराम मिळतो
…
बायकोशी कधीच खोटं बोलू नये
कारण,
बायको तेच प्रश्न विचारते ज्याची
उत्तरं तिला आधीपासूनच माहीत असतात!
…
रेल्वे टीसी तिकीट तपासत तपासत एका साधूजवळ येतो
टीसी - बाबा, कुठे निघालाय?
साधू - जिथं रामाचा जन्म झाला होता
टीसी - ठीक आहे. तिकीट दाखवा
साधू - तिकीट नाही आहे बाळा
टीसी - चला माझ्याबरोबर
साधू - कुठं?
टीसी - जिथं कृष्णाचा जन्म झाला होता तिथं.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या