Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एका महिलेला तीन जावई असतात.
आपल्या जावयांना आपल्याबद्दल काय वाटतं, हे जाणून घेण्यासाठी सासूबाई त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवते.
या परीक्षेसाठी ती पहिल्या जावयाला घेऊन नदीवर जाते आणि नदीमध्ये उडी मारते.
पहिला जावई आपल्या सासुबाईला वाचवतो.
खूश होऊन सासू त्याला मारुती कार घेऊन देते.
दुसऱ्या दिवशी सासू याच तलावाच्या ठिकाणी दुसऱ्या जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते.
दुसरा जावईही तिला वाचवतो. तर, सासू खूश होऊन त्याला बाईक घेऊन देते.
२ दिवसानंतर तिसरऱ्या जावयासोबत सासूने हीच गोष्ट करते.
यावर तिसरा जावई विचार करतो की, मला आता सायकलच मिळण्याची शक्यता आहे.
यामुळे त्यांना आता वाचवण्यात काय फायदा.. आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही.
सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो.
परंतु, पुढच्या दिवशी तिसऱ्या जावयाला मर्सिडीज कार मिळते.
विचार करा कसं काय...?
?
?
?
?
?
?
अरे, सासऱ्याने खूश होऊ दिली!
------------------------------------
जिव्हारी लागेल असा अपमान...
स्थळ: वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे घर
आई: जा बाळा, बाजारातून जरा सामान घेऊन ये...
मुलगा: आई, आला क्लायंटचा कॉल येणार आहे. नंतर जाऊ शकतो का?
आई: नाही आताच जा... ‘आय अॅम वर्किंग ऑन इट’ आणि ‘आय विल गेट बॅक टू यु’ हे एवढंच बोलायचं आहे ना? ते मी बोलते.. तू सामान घेऊन ये!
------------------------------------
पत्नीने नवऱ्याला न सांगता नवीन सीम कार्ड विकत घेतले.
नवऱ्याला सरप्राईज द्यावे, या हेतूने ती किचनमध्ये गेली.
तिथून नवीन नंबरवरून तिने नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली,
‘हाय डिअर, कसा आहेस..?’
नवरा दबक्या आवाजात: नंतर बोलतो, आमचं येडं किचनमध्ये आहे.
आता बायकोनं लाटणं तुटेपर्यंत मारला...
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)