Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
भाजलेले शेंगदाणे पारदर्शक बरणीत ठेऊ नये, लवकर संपतात.
त्याच शेजारी दुसऱ्या बरणीत खारवलेले काजू ठेवल्यास शेंगदाणे जास्त काळ टिकतात.
तुम्हाला काय वाटतं?
…
गुरुजी - सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?
बंड्या : झेब्रा.
गुरुजी : असं का बरं?
बंड्या : कारण तो ब्लॅक अँड व्हाईट असतो ना!
(गुरुजींनी स्वतःचं डोकं भिंतीवर आपटलं!)
…
ट्रेनमध्ये गावाकडची बाई तिच्या बाळाचा लंगोट बदलत असते
समोर बसलेली शहरी बाई म्हणते, हगीस नाही का?
गावाकडची बाई सहज उत्तर देते, नाही बाई, फक्त मुतीस!
…
ते दोघे एकाच प्लेटमध्ये भजी खात असतात!
मुलगा - तिच्या डोळ्यात एकसारखा बघत असतो.
मुलगी - लाजून म्हणते, काय बघतोयस रे?
मुलगा - थोडं थोडं खा ना भिकारे?
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)