Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
एक दारुडा वकिलाच्या ऑफिसमध्ये गेला आणि विचारू लागला…
वकील साहेब, मी जर सरकारमान्य दारूच्या दुकानातून दारू घेऊन पित असेन आणि
माझी बायको मला अडवत असेल तर…
सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल तिला शिक्षा होऊ शकते का?
वकिलानं त्या दारुड्याचे पाय धरले!
इतक्या वर्षांच्या करियरमध्ये मी कधीही हा विचार केला नाही!
…
पायातले मोजे नेहमी धुवून घालत जा…
उद्या असं होऊ नये की
यश तुमच्या पायाशी लोळण घ्यायला येईल आणि
वासानं तिथंच मरून जाईल!
…
अमेरिकेत एक टी-शर्ट फारतर दोनदा वापरून फेकून देतात…
भारतात बघा!
आधी बाहेर घालतात,
मग घरात घालायला ठेवतात.
नंतर फक्त रात्री झोपताना वापरतात
त्यानंतर रंगपंचमीला त्याचा वापर करतात
आणि शेवटी
लादी पुसायला वापरतात!
संबंधित बातम्या