Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
बायकोला समजून घेणं म्हणजे…
३२ GB चा Video Download करणं.
आणि
३१.५ GB Download झाल्यावर Error मेसेज दिसणं!!
.
.
जगात केवळ तेच लोक साधेभोळे असतात, ज्याच्या मोबाइलमध्ये पासवर्ड नसतात.
काही लोक whatsapp वर फक्त दोनच स्टेटस पोस्ट करतात.
पहिला…
good morning
दुसरा…
good night
असं वाटतं,
जणू whatsapp च्या दुकानाचं शटर उघडायची आणि बंद करायची जबाबदारी यांच्यावरच सोपवली असावी आणि मालाच्या खरेदी -विक्रीची जबाबदारी आपली.
.
.
एका सर्व्हेनुसार, आजही आपल्या देशात......
'तू प्यार है, किसी और का, तुझे चाहता कोई और है'
हे गाणं वाजल्यावर १० पैकी ८ मुलं इमोशनल होऊन जातात ...
.
.
भारतातले लोक इतके टॅलेंटेड असतात की,
गाडी हालवून सांगू शकतात… की गाडीत पेट्रोल किती आहे?
.
.
ट्रेनच्या आतल्या गर्दीच्या 'चक्रव्यूहाला भेदण्याचं जे कौशल्य' या ‘नमकीन अथवा शहाळी’ विकणाऱ्यांपाशी असतं ते तर 'अभिमन्यू' पाशीही नव्हतं.
संबंधित बातम्या