Marathi Jokes : तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतील हे अनुभवाचे बोल; मित्रांना शेअर करायला विसरू नका!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Marathi Jokes : तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतील हे अनुभवाचे बोल; मित्रांना शेअर करायला विसरू नका!

Marathi Jokes : तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतील हे अनुभवाचे बोल; मित्रांना शेअर करायला विसरू नका!

HT Marathi Desk HT Marathi
Feb 03, 2025 04:46 PM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहन्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा.

Marathi Jokes : तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतील ही वाक्ये; मित्रांना शेअर करायला विसरू नका!
Marathi Jokes : तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतील ही वाक्ये; मित्रांना शेअर करायला विसरू नका!

Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...

 

होमिओपॅथीची औषधं घेण्यातली मजा काही औरच...

औषधाच्या बाटलीतून ४ गोळ्या काढाव्या म्हटलं तर साबुदाण्याच्या ६ गोळ्या बाहेर पडतात. त्यातल्या पुन्हा २ गोळ्या परत टाकायला गेलो तर ४ गोळ्या बाटलीत परत जातात…

या गदारोळात रोग्याचं लक्ष आजारावरून दूर होतं आणि तो लवकर बरा होतो...

.

.

खरं पाहिलं तर जगातला कुठलाच मनुष्य शाकाहारी नसतो ...

कारण ,

थोडं बहुत डोकं तर प्रत्येकच जण खात असतो.

.

.

नोटा कागदापासून बनतात, कागद लाकडापासून बनतो आणि लाकूड झाडापासून मिळतं…

याचा अर्थ असा की पैसे झाडाला लागतात.

.

.

 

विवाहित माणसाला त्याच्या जीवनात किमान दोन खर्च तरी करावेच लागतात...

१. बायको गोरी असेल तर..

Sun Screen...

आणि

२. काळी असेल तर...

Fair & Lovely.....

.

.

असं म्हणतात की, जो हसला, त्याचं घर वसलं !!

पण… 

ज्याचं घर वसलं, त्याला विचारा…

की तो पुन्हा केव्हा हसला??

 

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

 

Whats_app_banner