Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
लग्नात जेवणाची पंगत पडलेली असते.
एक माणूस खूप वेळ खात असतो.
दुसरा त्याला विचारतो, अरे किती खातोयस.
पहिला म्हणतो, अरे मलाही खाऊन खाऊन कंटाळा आलाय,
पण काय करणार?
पत्रिकेतच लिहिलंय, जेवणाची वेळ ७ ते १० म्हणून
…
हेही वाचा: गुरुजी जेव्हा महान माणसाची व्याख्या सांगतात…
दोन-तीन दिवसांपासून बायको उदास असल्याचं पाहून नवरा शेवटी बोललाच,
काय राणी, खूप दिवसांपासून बघतोय तू उदास-उदास असतेस.
एवढा कसला विचार करतेस?
काही नाही! फक्त एकच विचार सारखा छळतोय की असं कसं होतंय?
लग्नाला इतकी वर्षे होऊनही तुम्ही आनंदात कसे राहता?
मी नेमकी कुठं कमी पडतेय?
(नवरा अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही)
संबंधित बातम्या