Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
मुलांनो, महान व्यक्ती तो असतो, जो नेहमीच दुसऱ्याची मदत करतो.
गुरुजींचं वाक्य संपताच बंड्या उठतो…
गुरुजी, परीक्षेत ना तुम्ही महानता दाखवता,
ना आम्हाला एकमेकांबद्दल दाखवू देता.
(गुरुजी सध्या सुट्टीवर आहेत.)
…
एक आजी आपल्या नातवासोबत देवळात जात असते.
तेवढ्यात तिची नजर एक मुलीवर पडते.
तिचं वाकडं तोंड बघून आजीला वाईट वाटतं.
ती नातवाला म्हणते, बहुतेक तिला लकवा गेलाय. तिचं नाक-तोंड बघ कसं वाकडं झालंय.
नातू - आजी लकवा-बिकवा काही नाही. ती सेल्फी काढतेय.
संबंधित बातम्या