Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
आजोबा - वयामुळं माझ्या तोंडात फक्त दोनच दात शिल्लक राहिले होते.
ते काढायला डॉक्टर २ हजार रुपये मागत होते.
पण सूनबाईनं केलेल्या चकल्या खाल्ल्या आणि
ते काम फुकटात झालं!
…
बॉस - अरे लग्न होतं ना तुझं…
मोठी सुट्टी टाकली होतीस…
फोटो तरी दाखव तुझ्या लग्नातले.
राजू - सर, तुळशीचं लग्न होतं.
…
विवाहित स्त्रीसाठी आनंदाचे ते ३ शब्द
.
.
.
उद्या डबा नको!
…
मुलगा - बाबा तुम्ही पण एक टिकल्यांची पिस्तुल घ्या ना!
बाबा - नको रे. माझ्याकडं एक टिकली लावलेली मशीनगन आहे.
संबंधित बातम्या