Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
एका दवाखान्याबाहेर पेशंट्सची रांग लागलेली असते.
कोणी आता जायला निघाला की मागचे लोक त्याला खेचायचे.
जाऊनच द्यायचे नाहीत.
एका माणसाला असं लोकांनी जाऊ दिलं नाही.
तो जायचा प्रयत्न करायचा आणि लोक मागे खेचायचे.
पाच-सहा वेळा असं झाल्यावर तो वैतागला आणि म्हणाला…
मरा तसेच.
मी आज दवाखानाच उघडणार नाही.
…
एकदा सहावीच्या परीक्षेत वर्गातल्या चार मुलांना समान गुण मिळाले.
शिक्षकांना प्रश्न पडला आता पहिला क्रमांक कोणाला द्यायचा.
शेवटी ते मुख्याध्यापकांकडं गेले.
मुख्याध्यापक म्हणाले, आपण त्यांना एक प्रश्न विचारूया. त्याचं उत्तर जो बरोबर देईल, त्याला पहिला क्रमांक देऊ.
मुख्याध्यापकांनी प्रश्न विचारला,
जगात सर्वात वेगवान काय आहे?
पहिला विद्यार्थी म्हणाला, विचार.
कारण डोक्यात कुठलाही विचार पटकन येतो आणि जातो.
दुसरा विद्यार्थी म्हणाला, पापणी लवणं.
पापणी लवण्याचा वेग सर्वाधिक असतो. आपल्याला कळतही नाही आणि पापणी लवते.
तिसरा विद्यार्थी म्हणाला, वीज.
आमच्या गॅरेजमध्ये लाइट हवी असते तेव्हा आम्ही एक बटण दाबतो आणि लाइट येते.
शेवटी चौथ्या विद्यार्थ्याची वेळ येते.
तिघांनी सर्व उत्तर दिली असल्यानं आता हा काय उत्तर देणार याविषयी उत्सुकता असते.
चौथा विद्यार्थी म्हणतो, जगात सर्वात वेगवान असतात 'जुलाब'
जुलाब ही अशी गोष्ट आहे की विचार करायला वेळ देत नाही. पापणी लवण्याच्या आत पोट रिकामं होतं. बटण दाबण्याचं लांबच राहिलं.
संबंधित बातम्या