Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
मी काल माझी बाइक धुवत होतो.
बाजूनं जाणाऱ्या ६ ओळखीच्या लोकांनी विचारलं…
काय बाइक धुतोयस का?
शेवटी न राहवून मी पुन्हा चेक केलं की नक्की आपण धुतोय काय?
…
एका जुन्या गर्लफ्रेंडनं तिच्या लग्नाची पत्रिका घरी पाठवली
ती पत्रिका पाहून वाईट वाटलं
पण मग ठरवलं,
लग्नाला नक्की जायचं!
प्रेम प्रेमाच्या जागी, त्याचा राग गुलाबजामवर कशाला काढायचा?
…
भिकाऱ्याकडं तिरस्कारानं बघून जाणाऱ्या एका ऑफिसरला भिकारी बोलतो…
साहेब, मी कोणी साधा भिकारी नाही.
पैसे कमावण्याचे १०० मार्ग… नावाचं पुस्तक लिहिलंय मी.
ऑफिसर - मग तू भीक का मागतोस?
भिकारी - हा त्या पुस्तकातला सर्वात सोपा मार्ग आहे.
संबंधित बातम्या