Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
एक सुंदर मुलगा एका वर्गात आला.
त्याला पाहून सर्व मुली हरखून गेल्या.
त्यानंतर तो मुलगा जे बोलला ते ऐकून सर्व मुली बेशुद्ध झाल्या.
काय म्हणाला तो मुलगा?
ताई जरा बाजूला होता का? मला झाडू मारायचा आहे.
…
आबुराव एका सुंदर मुलीच्या प्रेमात होता.
शेवटी हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचलं.
लग्न करण्याआधी सगळं काही विचारावं म्हणून मुलगी आबुरावांना म्हणाली…
तुमच्याकडं मारुती कार आहे का?
आबुराव - नाही
मुलगी - तुमच्याकडं फ्लॅट आहे का?
आबुराव - नाही
मुलगी - तुम्हाला नोकरी आहे का?
आबुराव - नाही
मुलीनं लग्नाला नकार दिला आणि ती निघून गेली.
आबुराव विचारात पडले. तिनं असं का केलं असावं?
माझ्याकडंं ५ बीएमडब्लू असताना हिला मारुती कार का पाहिजे होती?
माझ्याकडं बंगला असताना मला फ्लॅटची काय गरज?
माझा स्वत:चा बिझनेस असताना मी नोकरी कशाला करायची?
ती मला नेमकी का सोडून गेली?
म्हणून सर्वांना आपल्या मापात बसवण्याचा प्रयत्न करू नका. कदाचित तो तुमच्यापेक्षा मोठ्या विचारांचा असेल.
…
संताच्या बायकोची डिलिव्हरी झाली.
त्याला मुलगा झाला.
त्यानं होम डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीत फोन केला.
बायकोची डिलिव्हरी झाल्याचं सांगितलं.
कंपनीच्या कर्मचाऱ्यानं अभिनंदन केलं. तुम्हाला आमच्याकडून काय सेवा हवी आहे.
संता म्हणाला, तुम्ही कॅश पाठवून द्या.
कर्मचारी म्हणाला, आम्ही कशाबद्दल पैसे पाठवायचे?
संता - तुमच्या कंपनीनं सगळीकडं इतके मोठमोठे बोर्ड लावलेत ना की,
कॅश ऑन डिलिव्हरी
(समोरचा कर्मचारी बेशुद्ध)
संबंधित बातम्या