Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
आज खूप दिवसांनी तिचा फोन आला…
मी काही विचारायच्या आधी तिनंच विचारलं…
काय करतोस सध्या?
मीही साधेपणानं सांगून टाकलं.
मुलांचा अभ्यास घेतो…
किराणा, दळण, भाजी आणतो…
बायकोची बोलणी खातो आणि,
नोकरीही करतो…
हे ऐकून ती भावूक झाली आणि म्हणाली,
तुलाचा 'हो' म्हणायला हवं होतं रे!
…
बंड्या रोज उशिरा शाळेत जायचा.
एक दिवस गुरुजींनी त्याला पकडलंच
गुरुजी - काय रे उशीर का झाला?
बंड्या - गुरुजी, उशिरा उठलो.
गुरुजी - रात्री किती वाजता झोपतोस?
बंड्या - गुरुजी, पुस्तक वाचायला घेतलं तर १० वाजताच झोपतो
आणि
मोबाईल घेतला तर २ किंवा ३ सहज वाजतात.
(गुरुजींनी बंड्याला झोप उडेपर्यंत हाणला)
…
परीक्षा पास झाल्यावर…
आई - देवाची कृपा
बाबा - मुलगा कोणाचा आहे?
गुरुजी - माझ्या मेहनतीमुळं
मित्र - चल एक बियर मारू
आणि
परीक्षा नापास झाल्यावर…
आई - मोबाईलचा परिणाम
बाबा - आईचे लाड नडले
गुरुजी - वर्गात लक्षच नसतं.
मित्र - चल एक बियर मारू
सगळे बदलतात, पण मित्र कधीच बदलत नाही
(मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा)
संबंधित बातम्या