Marathi Jokes : आज माणुसकीवरचा विश्वासच उडून गेला, असं जेव्हा चोर कोर्टात सांगतो!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Marathi Jokes : आज माणुसकीवरचा विश्वासच उडून गेला, असं जेव्हा चोर कोर्टात सांगतो!

Marathi Jokes : आज माणुसकीवरचा विश्वासच उडून गेला, असं जेव्हा चोर कोर्टात सांगतो!

HT Marathi Desk HT Marathi
Jan 07, 2025 12:22 PM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहन्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा.

Marathi Jokes : आज माणुसकीवरचा विश्वासच उडून गेला, असं जेव्हा चोर कोर्टात सांगतो!
Marathi Jokes : आज माणुसकीवरचा विश्वासच उडून गेला, असं जेव्हा चोर कोर्टात सांगतो!

Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...

जगात सगळ्यात मोठा चमत्कार कुठे घडतो?

ब्युटी पार्लरमध्ये!

आतमध्ये जाते एक, बाहेर दुसरीच येते!

चोर एका घरात घुसतो…

अंधाराचा अंदाज घेत घेत तिजोरीपर्यंत पोहोचतो आणि हातातील टॉर्च पेटवतो

तिजोरीवर लिहिलेलं असतं की,

टाळा तोडायची गरज नाही. बटण दाबा उघडेल.

चोरानं बटण दाबताच पोलीस पोहोचले.

चोराला अटक झाली. त्याला न्यायालयात हजर केलं गेलं.

न्यायाधीश - तुला स्वत:च्या बचावासाठी काही बोलायचंय का?

चोर - काय बोलणार, साहेब.

आई शपथ सांगतो, आज माणुसकीवरचा विश्वास उडून गेला!

लोक विचारतात की, 

अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय केलं पाहिजे?

आमचं म्हणणं आहे की,

पुन्हा झोपायला पाहिजे!

तीन काळे मित्र सोबत चालले होते…

तेवढ्यात रस्त्यात देवी प्रकट झाली!

तिनं तिघांनाही वरदान मागायला सांगितलं.

तुमची एक इच्छा मी पूर्ण करेन. मागा काय मागायचं ते.

पहिला मित्र - मला गोरं बनव देवी

देवीनं आशीर्वाद दिला. तो गोरा झाला.

दुसऱ्यानंही गोरं होण्याची इच्छा व्यक्त केली.

तोही गोरा झाला.

देवीनं तिसऱ्याला विचारलं,

तो जोरजोरात हसायला लागला आणि म्हणाला,

या दोघांना पुन्हा काळं कर

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner