Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही. वाचा तर मग...
नदी किनारी एक जोडपे बसलेले असते.
वातावरण खूपच रोमँटिक झालेले असते.
प्रेयसी : तुझा काय प्लॅन आहे?
प्रियकर : तोच ग… १९९चा, १.५ जीबी पर डे…
प्रेयसी : मर मेल्या, मोबाईल मध्येच…!
------------------
देव : बाळा काय पाहिजे ते माग…
मुलगा : एक सुंदर बायको…
देव : जर तू मुस्लीम असशील तर,
तुला कतरिना मिळेल,
हिंदू असशील तर दीपिका,
आणि
ख्रिश्चन असशील तर जॅकलिन देईन.
बोल तुझं नाव काय…?
मुलगा (विचार करून) : अब्दुल तुकाराम डिसोजा…
देव : लई दीड शहाणा दिसतोय…
याला शांताबाई द्या रे…!
मास्तर : १) त्याने भांडी घासली…
२) त्याला भांडी घासावी लागली.
या दोन वाक्यात काय फरक आहे…?
मन्या : पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहित आहे.
आणि
दुसऱ्या वाक्यात कर्ता विवाहित आहे.
मास्तरांचे डोळे भरून आले…!
------------------
संता एकदा नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला गेला…
बॉस : काय झालं…?
संता : सर मी, खूपच नर्वस होऊन राहिलोय…
बॉस : अरे घाबरू नको, तू माझ्याशी अगदी मित्र समजून बोल…
संता : च्यायला, मी तर उगाच घाबरत होतो,
मग काय चाललय बाकी, वहिनी कशा आहेत…?
मुलबाळ मजेत ना…!
------------------
एक दारुड्या विमानतळाच्या बाहेर उभा असतो.
एक तरुण त्याच्या शेजारून चाललेला असतो.
दारुड्या त्या तरुणाला : एक टॅक्सी घेऊन ये…!
तरुण : मी पायलट आहे. टॅक्सीचा ड्रायव्हर नाही.
दारुड्या : अरे नाराज नको होऊ, मग एक विमान घेऊन ये…!
संबंधित बातम्या