Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
डॉक्टर पेशंटला म्हणतो,
तू खूप अशक्त झालायस.
सालीसकट फळं खायला सुरुवात कर.
दोन दिवसांनी तोच पेशंट पुन्हा येतो.
डॉक्टर साहेब, पोटात खूप दुखतंय.
डॉक्टर - काय खाल्लं होतं?
पेशंट - नारळ, तोही सालीसकट.
(डॉक्टर बेशुद्ध)
…
एक व्यापारी मरणाच्या दारात होता.
कधी जीव जाईल त्याचा नेम नव्हता. सगळ्यांची आठवण काढत होता.
व्यापारी - माझी बायको कुठं आहे?
बायको - मी इथंच आहे!
व्यापारी - मुलगा कुठं आहे?
मुलगा - मी तुमच्या बाजूलाचा आहे पप्पा
व्यापारी - माझी बिटिया राणी कुठं आहे?
मुलगी - पप्पा, मी पण इथंच आहे.
व्यापारी - (भडकून) अरे येड्यांनो, तुम्ही सगळे इथं आहात, मग दुकानावर कोण आहे?
…
एकदा धोंडूबरोबर त्याची बायको बाजारात फिरायला गेली.
रस्त्यात चालता-चालता म्हणाली,
तो बघा, एक माणूस मला टकामका बघतोय.
धोंडू म्हणाला… डार्लिंग, तो भंगारवाला आहे.
बेकार मालावर लक्ष ठेवणं त्याचं काम आहे.
संबंधित बातम्या