Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
खवळलेली बायको नवऱ्याला म्हणाली,
कंटाळले मी तुमच्या रोजच्या कटकटीला
मला घटस्फोट हवाय!
नवरा - हे घे चॉकलेट खा!
बायको (थोडी नरमली) - तुम्ही माझी मनधरणी करायया प्रयत्न करताय का?
नवरा - छट वेडी.
माझी आई म्हणते, चांगलं काम करायच्या आधी काहीतरी गोड खायचं असतं.
…
एका पार्टीत एक सुंदर मुलगी एका मुलाकडं गेली.
मुलगी - शुक शुक… ऐक ना!
माझ्या एका हातात ग्लास आणि दुसऱ्या हातात प्लेट आहे.
तू माझ्या चेहऱ्यावर एक गोष्ट हटवशील का?
मुलगा - (हुरळून) काय हटवू?
मुलगी - तुझी कुत्र्यासारखी नजर
…
नवरा-बायको मंदिरात गेले. पूजा केली आणि देवाकडं मागणं मागितलं.
नवरा - तू देवाकडं काय मागितलंस?
बायको - मी मागितलं की आपली साथ सात जन्म राहावी आणि
तुम्ही काय मागितलं?
नवरा - देव करो, माझं सगळं एकाच जन्मात आटपावं! सातवा जन्मच मिळू नये.
(नवरा दोन दिवस उपाशी होता)
संबंधित बातम्या