Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
आजारी धोंडू तिसऱ्यांदा डॉक्टरकडं गेला.
डॉक्टरनं त्याला पुन्हा तपासलं.
डॉक्टर - तुम्हाला नेमका आजार काय आहे हे कळेनासं झालंय मला.
कदाचित दारूमुळं असं होत असेल.
धोंडू - काही हरकत नाही डॉक्टर.
तुमची उतरली की मी पुन्हा येईन तपासून घ्यायला.
…
एक गृहस्थ गेल्या ५० वर्षांपासून गीतेच्या विचारावर चालत आहेत.
थोडी चौकशी केली तेव्हा कळलं की,
गीता त्यांच्या पत्नीचं नाव आहे!
…
डॉक्टरांनी एका पेशंटला विचारलं,
तुमचा आणि तुमच्या बायकोचा ब्लड ग्रुप सेमच आहे.
तुम्हाला हे माहीत आहे का?
पेशंट - कधी चेक केला नाही.
पण सेम असला तर त्यात आश्चर्य काहीच नाही.
५० वर्षे झाली माझंच रक्त शोषतेय ती.
संबंधित बातम्या