Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
एका विद्वानाला फाशीची शिक्षा सुनावली गेली होती.
राजाने त्याला एक संधी दिली.
तू एका प्रश्नाचं उत्तर दिलंस तर तुझा जीव वाचू शकतो.
प्रश्न होता की, स्त्रीला नेमकं हवं काय असतं?
विद्वान म्हणाला, मला थोडा वेळ दिलात तर माहिती घेऊन सांगतो.
राजानं त्याला एक वर्षाची मुदत दिली.
तो वर्षभर खूप फिरला पण त्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही.
कुणीतरी त्याला सांगितलं, एका जंगलात चेटकीण राहते. ती याचं उत्तर देईल.
तो तिच्याकडं गेला आणि प्रश्न विचारला.
तिनं उत्तरासाठी अट ठेवली. ती म्हणाली, तू माझ्याशी लग्न केलंस तर सांगेन.
विद्वानानं विचार केला. असंही मी उत्तर दिलं नाही तरी राजा माझा जीव घेणारच आहे.
विद्वान लग्न करायला तयार झाला.
लग्नानंतर चेटकीण म्हणली, तू माझ्याशी लग्न केल्यामुळं मी खूष आहे.
आता मी तुला खूष करणार आहे.
मी १२ तास चेटकीण आणि १२ तास परी बनून राहीन.
आता तू सांग. दिवसा चेटकीण बनून राहू की रात्री.
तो विचारात पडला.
तुझ्या मर्जीनुसार तू परी बन आणि मर्जीनुसार चेटकीण.
चेटकीण खूष झाली आणि म्हणाली,
तू मला माझ्या मर्जीनं राहायला सांगितलंय त्यामुळं मी खूष झालेय.
मी कायम परी बनून राहीन.
आणि हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे.
प्रत्येक स्त्रीला आपल्या इच्छेनुसार वागायचं असतं.
पुरुषानं ती सूट दिली तर ती परी बनून राहते, नाहीतर चेटकीण
आता तुम्हाला ठरवायचं आहे बायकोला काय बनवून ठेवायचं.
(सर्व विवाहीत पुरुषांना समर्पित)
संबंधित बातम्या