Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...
प्रेयसी - माझा मोबाइल माझ्या आईकडं असतो.
प्रियकर - अगं पण तिनं पकडलं आपल्याला तर?
प्रेयसी - तुझा नंबर 'बॅटरी लो' या नावानं सेव्ह करून ठेवलाय.
तू फोन केलास की आई स्वत: फोन आणून देते आणि म्हणते,
हे घे. बॅटरी लो आहे. चार्ज कर.
(प्रियकर अजून धक्क्यात आहे.)
…
वर्गात जनरल नॉलेजचा तास सुरू असतो.
बरीच माहिती देऊन झाल्यानंतर गुरुजी मुलांना प्रश्न विचारतात…
गुरुजी - टायगर बिस्किटाच्या पुड्यावर जे तीन हिरवे डॉट असतात त्याचा अर्थ काय?
बंड्या लगेच उभा राहतो.
गुरुजी - अरे व्वा बंडू. सांग सांग…
बंड्या - गुरुजी, त्या तीन डॉटचा अर्थ वाघ ऑनलाइन आहे.
…
गुरुजी - ध्येय उच्च असलं की दगडालाही पाझर फोडता येतो.
बंड्या - गुरुजी, मी तर लोखंडालाही पाझर फोडू शकतो.
गुरुजी - कसा रे?
बंड्या - हँडपंपने
(गुरुजींनी बंड्याला गदरमधल्या सनी देओलच्या स्टाइलनं मारला)
संबंधित बातम्या