Marathi Jokes: पूर्वी दोन माणसांची भांडणं सोडवायला तिसरा व्यक्ती जायचा! आताही जातो पण...
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Marathi Jokes: पूर्वी दोन माणसांची भांडणं सोडवायला तिसरा व्यक्ती जायचा! आताही जातो पण...

Marathi Jokes: पूर्वी दोन माणसांची भांडणं सोडवायला तिसरा व्यक्ती जायचा! आताही जातो पण...

Dec 25, 2024 09:17 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहन्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा.

Marathi Jokes : पूर्वी दोन माणसांची भांडणं सोडवायला तिसरा व्यक्ती जायचा! आताही जातो पण...
Marathi Jokes : पूर्वी दोन माणसांची भांडणं सोडवायला तिसरा व्यक्ती जायचा! आताही जातो पण...

Viral jokes in Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही। वाचा तर मग...

पूर्वी दोघांचे भांडण सुरू झाले तर

तिसरा सोडवायला जायचा…

आता

.

.

.

तिसरा त्या भांडणाचा व्हिडिओ बनवतो.

 

------------------

 

बायको : नेहमी माझं अर्ध डोक दुखत राहते.

वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं…

नवरा : अरे त्यात काय दाखवायचं…!

जितकं आहे तितकंच दुखणार ना…!

बस्स…! तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखत आहे.

 

 

डॉक्टर : बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात

आणि

सगळेच रिपोर्ट नॉर्मल आले आहेत.

काही कळतच नाहीये,

यांना नेमकं काय झालंय ते…?

बाई (काळजीच्या सुरात) : अहो डॉक्टर साहेब, ते

पोस्ट मार्टम का काय असतं, ते तरी करून पहा एकदा…!

(पेशंट फरार आहे…)

 

------------------

 

मीना : अगं काल दिवसभर नेट चालत नव्हते…

शीना : मग काय केले…?

मीना : काही नाही गं, नवऱ्याबरोबर गप्पा मारत होते.

चांगला वाटला गं स्वभावाने…

 

------------------

 

नोकर : साहेब मला केराच्या टोपलीत

शंभराच्या पाच नोटा सापडल्या, ह्या घ्या.

मालक : मीच फेकून दिल्या होत्या, नकली आहेत त्या…

नोकर : म्हणूनच परत करत आहे…!

 

(टीप: हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)

Whats_app_banner