Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
पप्पू टेलिकॉम कंपनीच्या ऑफिसमध्ये मुलाखतीसाठी गेला.
मॅनेजरनं त्याचं स्वागत केलं. पाणी वगैरे दिलं. त्यानंतर प्रश्नोत्तराला सुरुवात झाली.
मुलाखतकाराचा पहिला प्रश्न - सर्वात लोकप्रिय नेटवर्क कोणतं?
पप्पू - कार्टून नेटवर्क
मॅनेजरनं दुसरा प्रश्न विचारलाच नाही!
…
टप्पू शाळेच्या अॅडमिशनचा अर्ज भरत असतो.
अर्जावर एका ठिकाणी ओळखीचं चिन्ह (Identification Mark) असं विचारलेलं असतं.
टप्पू गोंधळून जातो. तो आईला विचारतो…
आई, आयडेंटिफिकेशन मार्क काय लिहू?
आई - 'हातात मोबाईल' असं टाक.
…
बसमध्ये दोन मुली सीटसाठी भांडत असतात.
कंडक्टर मध्यस्थी करतो.
कशासाठी भांडताय?
वयानं जी लहान असेल तिला बसू द्या.
शेवटच्या स्टॉपपर्यंत ती सीट रिकामी होती.
संबंधित बातम्या