Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
रेल्वे ब्रिजवरून जाणाऱ्या बंड्याला टीसीनं पकडलं.
टीसी - तिकीट दाखव.
बंड्या - मी रेल्वेनं आलोच नाही.
टीसी - कशावरून? काय पुरावा आहे तुझ्याकडं?
बंड्या - माझ्याकडं तिकीट नाही हाच पुरावा
टीसीनं कपाळाला हात मारला
…
गुरुजी - निर्मळ भावनेनं केलेली प्रार्थना देव नेहमी ऐकतो.
पिंट्या - सोडा ओ गुरुजी.
तसं झालं असतं तर आज तुम्ही माझे सासरे असता.
गुरुजींनी पिंट्याला कुट कुट कुटला!
…
वर्गात भुगोलाचा तास सुरू असतो.
गुरुजी प्रश्न विचारतात…
गुरुजी - भारतातील सगळ्या घातक नदी कोणती?
गोट्या - गुरुजी भावना.
गुरुजी - म्हणजे? ते कसं काय?
गोट्या - हिच्यात सगळेच वाहून जातात.
(गोट्याला हाणावा की त्याचा सत्कार करावा हेच गुरुजींना कळेना)
संबंधित बातम्या