Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एक शायर म्हणतो…
मुलगी जेव्हा प्रेयसी असते, तेव्हा ती आपला जीव की प्राण असते…
मुलगी जेव्हा प्रेयसी असते, तेव्हा ती आपला जीव की प्राण असते…
तीच मुलगी जेव्हा आपली बायको बनते तेव्हा…
.
.
.
तेव्हा ती जीवघेणी ठरते…
शायराला सगळ्या बायकांनी भर कार्यक्रमात बदडला…
…
बाप-लेक लग्नाबद्दल चर्चा करत असतात.
बाप मुलाला लग्न करण्याविषयी परोपरीनं विनवणी करत असतो.
मुलगा : बाबा, मला लग्नच करायचं नाही. मला सगळ्या बायकांची भीती वाटते.
बाबा : असं नको करू बाळा. लग्न कर, सगळं काही बदलून जाईल.
मुलगा : काय बदलून जाईल?
बाबा : एकदा लग्न केलंस की एकाच बाईची भीती वाटेल, बाकी सगळ्या चांगल्या वाटायला लागतील.
संबंधित बातम्या