Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
बंड्या बँकेत गेला आणि क्लार्कला भेटला.
साहेब, मला जॉइंट अकाऊंट सुरू करायचंय
क्लार्क - कोणासोबत?
बंड्या - ज्याच्या अकाऊंटमध्ये भरपूर पैसे आहेत त्याच्यासोबत.
क्लार्क - सिक्युरिटी ह्याला धक्के मारून बाहेर काढा.
…
गुरुजी मुलांना एक प्रश्न विचारतात.
काट्याकुट्यांनी भरलेल्या मार्गावर तुमची साथ कोण देईल?
नवरा-बायको, भाऊ-बहीण, आई-वडील, प्रियकर-प्रेयसी की मित्र?
बंड्या - लगेच उठून उभा राहिला आणि म्हणाला,
गुरुजी चप्पल
(बंड्याला गुरुजींनी चपलेनं मारला)
…
शिष्य : महाराज, माझ्या उजव्या हाताला खाज येतेय.
महाराज - बाळा, लक्ष्मी येणार आहे.
शिष्य : महाराज, उजव्या पायालाही खाज येतेय.
महाराज - बाळा, तीर्थयात्रेचा योग आहे.
शिष्य : महाराज, पोटातही खाज येतेय.
महाराज - चांगलं जेवण मिळेल.
शिष्य : महाराज, माझ्या मानेलाही खाज येतेय.
महाराज - चल पळ इथनं… तुला गजकरण झालंय.
संबंधित बातम्या