Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
नवरा-बायकोचं जोरदार भांडण झालं...
दोघंही एकमेकांची उणी-दुणी काढत होते...
कोणीही माघार घ्यायला तयार नव्हतं.
तोंडाला येईल ते बोलत होते.
रागाच्या भरात नवरा म्हणाला, तुझ्यासारख्या खूप बघितल्यात...
काय करायचं ते कर, जा!
ते भांडण होऊन आज तीन दिवस झाले,
नवरा अजूनही मोबाइलचा चार्जर शोधतोय!
...
बंड्या झाडाला उलटा लटकला होता...
पप्पूनं विचारलं, हे काय करतोयस?
बंड्या : काही नाही रे, डोकेदुखीची गोळी खाल्लीय. ती पोटात जाऊ नये म्हणून उलटा लटकलोय
तेव्हापासून पप्पू स्वत:चं डोकं धरून बसलाय!
…
बायको: तुम्हाला एक प्रश्न विचारते, जगातील सर्वोत्तम गायक कोण?
नवरा: मला सांगता येणार नाही, तूच सांग!
बायको: मच्छर
नवरा: कसं काय?
बायको: तिचं गाणं कुणाला आवडो किंवा ना आवडो, टाळ्या वाजवाव्याच लागतात.
त्या दिवसापासून नवरा टाळ्या वाजवतोय