Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
पंडीत : मी ९० वर्षांचा आहे आणि एकही माणूस माझा शत्रू नाही.
तरुण - कमाल आहे. तुम्ही खूपच सज्जन दिसताय.
पंडित - यात माझं काही मोठेपण नाही. सगळी देवाची कृपा. माझ्या वयाचे सगळे ढगात गेलेत.
…
एक महिला त्वचेच्या डॉक्टरकडं गेली आणि म्हणाली,
माझा चेहरा सुंदर करण्यासाठी किती खर्च येईल?
डॉक्टर - तीन हजार पाचशे रुपये.
बाई - यापेक्षा स्वस्तातला काही उपाय नाही का?
डॉक्टर - एक उपाय आहे. तुम्ही चेहऱ्यावर पदर घ्यायला सुरुवात करा.
…
एक बाई - तू माझ्या मुलाला का मारलंस?
तरुणी - तो मला म्हैस म्हणाला.
बाई - मग त्याला मारून काय होणार आहे?
त्याला मारण्यापेक्षा तू तुझा खुराक कमी करायला पाहिजे.
संबंधित बातम्या