Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
पुणेरी डोकं
कोणीतरी एकदा पुण्यातील एका प्रख्यात वकिलाला प्रश्न विचारला की,
महाभारत आणि रामायणामध्ये काय फरक आहे?
वकिलानं एकदम वकिली भाषेतच उत्तर दिलं..
महाभारतामध्ये जमिनीबद्दल वाद होता. ती सिव्हील केस होती, तर रामायणामध्ये अपहरणाची केस होती. म्हणजे ती क्रिमिनल केस होती.
मग…
हाच प्रश्न जेव्हा पुण्यातील प्रख्यात साहित्यकांना विचारला,
तेव्हा त्यांच्याकडे अगदी मार्मिक उत्तर होतं. ते म्हणाले....
हरणाचं वस्त्र बनवण्यावरून झाले ते रामायण
आणि
वस्त्राचं हरण करण्यावरून झालं ते महाभारत.
…
तुमची बायको फारच किरकिर करत असेल तर…
उंबरठ्याजवळ जा, सरळ चप्पल उचला आणि पायात घालून बाहेर पडा!
चप्पल उचलून बाकी काही करण्याचा विचार करू नका, कारण…
त्याच्यासाठी हिंमत लागते!
…
एकदा काही डॉक्टरांनी मिळून एका हत्तीचं ऑपरेशन केलं…
ऑपरेशन झाल्यानंतर वरिष्ठ डॉक्टरांनी कम्पाऊंडरला सांगितलं की,
हत्तीच्या पोटात सर्जरीचं काही साहित्य राहिलं तर नाही ना चेक कर एकदा.
कम्पाऊंडर डॉक्टरांना म्हणाला,
डॉक्टर साहेब, ऑपरेशनची सगळी हत्यारं आहेत, पण डॉ. गुप्ता कुठं दिसत नाहीएत
(तुम्हाला काय वाटतं डॉ. गुप्ता कुठे असतील?)