Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
रमेशचं नवीन नवीन लग्न झालं.
तो त्याच्या मित्राला मुकेशला म्हणाला - मित्रा, मला काही तरी अशी टीप दे की मी माझ्या बायकोचं मन जिंकून घेईन
मुकेश म्हणाला, तू सिगारेट ओढतोस का?
रमेश - नाही
मुकेश - मग आजचा दिवस ओढ आणि बायकोजवळ बसून सिगारेटचा धूर तिच्या तोंडावर सोड.
मग ती म्हणेल, मला सिगारेटचा धूर आवडत नाही.
ती तसं म्हणताच तू सिगारेट फेकून दे आणि म्हण की प्रिये, तुझ्यासाठी आजपासून सिगारेट बंद.
ती खूष होईल.
रमेश घरी गेला आणि मुकेशनं सांगितलं तसंच केलं.
जेव्हा सिगारेटचा धूर बायकोच्या नाकात गेला
ती म्हणाली, गोल्ड फ्लेक आहे का?
मला पण एक पफ द्या ना!
(रमेश बेशुद्ध)
…
नवरा : लग्नापूर्वी तुझे किती बॉयफ्रेंड होते?
नवऱ्याच्या या प्रश्नावर बायको गप्प राहिली. उत्तरच देईना!
नवरा भडकला!
तुझ्या या शांत राहण्याचा अर्थ मी काय घेऊ?
बायको - अहो, ओरडताय कशाला? मोजायला वेळ तरी द्याल की नाही!
…
सकाळी-सकाळी झोपेतून उठून बायको म्हणाली, अहो ऐकलंत का?
नवरा - बोल, काय झालं?
बायको - मला स्वप्न पडलं की तुम्ही माझ्यासाठी हिऱ्याचा हार घेऊन आलात.
नवरा - ठीक आहे, मग पुन्हा झोप आणि तो हार गळ्यात घाल.
संबंधित बातम्या