Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
पिंकी एका गरोदर महिलेच्या पोटाला हात लावत म्हणाली, ‘हे काय आहे काकी?’
काकू म्हणाल्या, हे माझं लाडकं बाळ आहे. मी त्याच्यावर खूप खूप खूप प्रेम करते.
पिंकी आश्चर्यानं म्हणाली, आले व्वा! तुम्हाला बाळ एवढं आवडतं तर मग तुम्ही त्याला खाऊन का टाकलं?
…
गुरुजी - बंड्या, माझी लाडकी मांजर या विषयावर तू जो निबंध लिहिलायस तो तर हरीच्या निबंधासारखा आहे. एका शब्दाचाही फरक नाही.
असं कसं?
तू त्याची कॉपी तर केली नाहीस ना?
बंड्या - नाही सर, अजिबात नाही.
कदाचित मी ज्या मांजरीवर निबंध लिहिलाय, त्याच मांजरीवर हरीनं लिहिला असेल.
…
हॉटेलमध्ये जेवून झाल्यावर एक म्हातारा वेटरला १० रुपयांची टीप देऊन निघाला…
वेटर म्हणाला, साहेब मागच्या वेळी तुम्ही १०० रुपये दिले होते. त्याबद्दल तुमचे आभार. देव करो, तुम्हाला १०० वर्षांचं आयुष्य लाभो.
पण साहेब यावेळी १० रुपयांची नोट का?
आता १०० वर्षे जगण्याची इच्छा नाही.
मुलगा सुनेला घरी घेऊन आलाय.
संबंधित बातम्या