Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एकदा एक नवरा केस कापण्यासाठी सलूनमध्ये जातो,
नवरा : केस जरा बारीक कापा.
सलूनवाला : किती बारीक करू केस?
.
.
.
नवरा - बायकोच्या हातात येणार नाहीत इतके!
--------------
एक माणूस रस्त्यावर खड्डे खणत पुढे येत होता; मागून दुसरा माणूस ते बुजवत येत होता…
एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे नक्की काय करताय…?
तर ते म्हणाले, ‘हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम सुरू आहे.’
मला खड्डे बनवण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे.
आमच्यासोबत जो झाडं लावणारा माणूस आहे, तो आज रजेवर आहे.
आम्ही आमचे काम करत आहोत…!!!
---------------
एक माणूस फिक्स्ड डिपॉजिट करण्यासाठी बँकेत जातो आणि तिथे विचारतो...
माणूस : सर मला या बँकेत फिक्स्ड डिपॉजिट करायचे आहेत.
क्लार्क : सॉरी सर! सध्या ती स्कीम बंद झाली आहे.
ग्राहक : असं कसं नाहीये! मग भिंतीवर त्या पाटीवर कशाला लिहीलं आहे?
क्लार्क : भिंतीवर गांधीजी पण आहेत. आहेत का ते आता?
-----------------
एका जंगलात दोन वाघ झाडाखाली आराम करत बसले होते…
इतक्यात त्यांच्या समोरून एक ससा जोरात पळून गेला…
पहिला वाघ : आयला, काय गेलं रे समोरून…?
दुसरा वाघ : काही नाही रे, सोड… फास्ट फूड होतं...
-----------------
तीन उंदीर एकमेकांशी गप्पा मारत असतात.
पहिला : मी विषारी गोळ्या आरामात चघळतो.
दुसरा : मी तर पिंजऱ्यातील पनीर खाऊन आरामात बाहेर येतो.
तिसरा लगेच उठतो आणि जायला लागतो,
पहिला आणि दुसरा विचारतात,
काय झालं कुठं चालला…?
तिसरा : आलोच जाऊन, मांजरीचा कीस घेऊन…
संबंधित बातम्या