Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
१२ वर्षांनंतर तो जेलमधून सुटला.
दाढी वाढलेल्या, थकलेल्या अवस्थेत तो घराजवळ पोहोचला.
घराचा दरवाजा वाढवला.
बायकोनं दार उघडलं आणि म्हणाली,
तुमची सुटका होऊन दोन तास झाले.
कुठं फिरत होतात तुम्ही इतका वेळ. असं काय काम होतं?
तो पुन्हा तुरुंगात गेला.
(बाकी तुम्ही सूज्ञ आहात.)
…
आबुराव दारूच्या नशेत टाळं खोलायचा प्रयत्न करत होता.
हात थरथरत असल्यानं त्याला टाळं खोलताच येत नव्हतं.
बाबुराव म्हणाला, थांब मी खोलून देऊ का?
आबुराव - नको रे भाई, तू फक्त घर पकडून ठेव
सालं खूप हलतंय!
…
काल माझ्या शेजाऱ्यानं ३२ इंची कलर टीव्ही आणला.
मग मी मागे राहतो काय?
मागचा पुढचा विचार न करता भंगाराच्या दुकानातून मी ५५ इंची टीव्हीचा बॉक्स आणून दरवाजात ठेवला.
आता शेजाऱ्याचा चेहरा बघून जो आनंद मिळतो, तो टीव्ही बघून कधीच मिळाला नसता.
संबंधित बातम्या