Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
L.L.B. चा वर्ग सुरू असतो…
प्रोफेसर : जर तुम्हाला एखाद्याला मोसंबी द्यायची असेल तर तुम्ही काय बोलून द्याल?
बंड्या : ही घे मोसंबी
प्रोफेसर : नाही... वकिलासारखे बोल...
बंड्या : मी बंडू, खंडूचा मुलगा, आगवणेवाडी, महाराष्ट्र. याद्वारे, कोणत्याही भीती किंवा दबावाशिवाय, मी हे मोसंबी नावाचं फळ तुम्हाला देत आहे, ज्यावर माझी संपूर्ण मालकी आहे, त्याची साल, रस आणि बिया देखील मी तुम्हाला विनाअट देत आहे. यापुढं यावर तुमचा अधिकार राहील. हे फळ तुम्ही कापू, सोलू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा खाऊ शकता.
तुम्हाला हा देखील अधिकार असेल की,
हे फळ तुम्ही इतर कोणत्याही व्यक्तीला देऊ शकता
त्याची साल, रस आणि बियांसोबत किंवा त्याशिवाय देऊ शकता.
मी हे सुद्धा जाहीर करतो की
याआधी या मोसंबीशी संबंधित कोणत्याही प्रकारचा वादविवाद झाला असल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी माझी,
आणि यापुढं या मोसंबीशी माझा कोणत्याही प्रकारे संबंध राहणार नाही….
(प्रोफेसर बेशुद्ध )
…
लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच जावई सासुरवाडीला जातो.
नवीन नवीन लग्न असल्यानं जावयाचा जोरदार पाहुणचार होतो.
सासूबाईंना तर जावईबापूंना कुठे ठेवू आणि कुठे नको असं होऊन जातं.
जेवणं वगैरे झाल्यावर सगळे गप्पा मारत बसलेले असतात.
जावई - तुमचं गाव खूप सुंदर आहे. पण प्रत्येक चांगल्या गावात काहीतरी डेंजर असतंच.
तुमच्याकडं असं काय आहे?
सासूबाई - आता काही नाही.
जे होतं ते तुम्ही घेऊन गेलात!
…
पिंट्या - यार माझे पप्पा दिवसेंदिवस वेड्यासारखे करतायत.
कौन बनेगा करोडपतीमधल्या अमिताभसारखे वागतायत
चिंट्या - का रे काय झालं?
पिंट्या - काही नाही रे.
त्यांच्याकडं कधीही पैसे मागितले की विचारतात, क्या करोगे इतनी धनराशी का?