Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एका आश्रमात सात साधू ७ चटया टाकून बसले होते!
तिथं एक माणूस आला.
त्याचा चेहरा त्रासलेला होता.
त्यानं सर्वात मोठ्या दिसणाऱ्या साधूला विचारलं…
बाबा, माझी बायको माझं ऐकतच नाही. जीव कंटाळलाय.
काही उपाय सांगाल का?
मोठा साधू छोट्या साधूला म्हणतो…
ह्या दादांसाठी आणखी एक चटई टाका इथं
(बाकी तुम्ही सूज्ञ आहात.)
…
बंठी - अरे तू साखरपुडा का मोडलास?
काश्या - यार, तिचा एकही बॉयफ्रेंड नव्हता.
बंठी - मग काय झालं? चांगली गोष्ट आहे.
काश्या - काय डोंबलाचं चांगलं आहे?
जी आजपर्यंत कोणाची झाली नाही, ती माझी काय होणार?
…
एक दिवस आबुराव महाराजांकडं गेले.
महाराजांनी त्यांचा हात बघितला आणि म्हणाले,
तुमच्या कुंडलीत खूप धन आहे.
आबुराव - ते ठीक आहे. पण ते धन बँकेत कसं ट्रान्सफर होणार ते सांगा!
(महाराज बेशुद्ध)